लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! या दिवशी दोन हप्त्याचे 3,000 रुपये खात्यात जमा होणार..

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ladki Bahin Yojana Scheme: महाराष्ट्रातील लाखो बहिणी ‘माझी लाडकी बहीण’ योजनेच्या पैशाकडे डोळे लावून बसल्या आहेत. डिसेंबर महिना सुरू झाला तरी अजूनही नोव्हेंबरचा १५०० रुपयांचा हप्ता अनेकांच्या खात्यात जमा झालेला नाही. त्यामुळे “कधी पैसे येणार?” या प्रश्नाने लाभार्थी महिलांची चिंता वाढली आहे. पण याच दरम्यान एक दिलासादायक बातमी पुढे येत आहे. सरकार या महिन्यात बहिणींना एक नाही तर दोन हप्ते देण्याच्या मूडमध्ये असल्याची चर्चा रंगली आहे. म्हणजेच एकाचवेळी ३००० रुपये बहिणींच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे!

निवडणुकीचा परिणाम?

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू आहेत. त्यामुळेच नोव्हेंबरचा हप्ता थांबला असल्याचे अनेकांचे मत आहे. निवडणुकांमुळे प्रक्रिया थोडी उशिरा झाली असू शकते. यापूर्वी विधानसभा निवडणुकांच्या वेळीही अगदी अशाच प्रकारे दोन महिन्यांचे हप्ते एकाचवेळी बहिणींना मिळाले होते. त्यामुळे याहीवेळी अशीच स्थिती निर्माण होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते.

नवीन वर्षाचं गिफ्ट आधीच?

मंत्रीमंडळाकडून अद्याप कोणती अधिकृत घोषणा आलेली नसली, तरी सरकारी सुत्रांकडून एखादा आनंदाचा निर्णय पुढील आठवड्यात घेतला जाण्याची शक्यता सांगितली जात आहे. नोव्हेंबर + डिसेंबर = ३००० रुपये जर असे झाले तर अनेक घरांत या महिन्यात मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. Ladki Bahin Yojana Scheme

काही बहिणींना अजूनही पैसे का नाही?

अनेक लाभार्थी बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता अजून मिळालेला नाही. काहींसाठी कारण साधं आहे – E-KYC पूर्ण न होणे.

सरकारने वारंवार सांगितले आहे की,
➡️ योजना पुढे सुरू ठेवण्यासाठी
➡️ प्रत्येक महिन्याचे पैसे मिळण्यासाठी
E-KYC पूर्ण करणे आवश्यक आहे.

तर नेमकं काय होणार?

महत्वाचे मुद्दे थोडक्यात👇

✔ नोव्हेंबर-डिसेंबर दोन्ही हप्ते मिळण्याची मोठी शक्यता
✔ एकूण रक्कम – ३००० रुपये
✔ काहींना अजून नोव्हेंबरचा हप्ता मिळालेला नाही
✔ जे मिळाले नाहीत त्यांनी E-KYC करून ठेवावी
✔ सरकारकडून अधिकृत घोषणा अद्याप नाही

घरात सणासुदीचं वातावरण

महिलांना महिना १५०० रुपये हा छोटासा आधार असला, तरी घरखर्च, मुलांचे शिक्षण, औषधोपचार यासाठी मोठा हातभार ठरतो. या महिन्यात जर ३००० रुपये आले तर घरातील सणासुदीचा खर्च, किराणा, गॅस, वीज यांतही मदत होईल, हे नक्की. अनेक गरीब कुटुंबातील बहिणींसाठी हे रक्कम म्हणजे आशेचा किरण आहे. विशेषतः शेवटचा महिना असल्याने नाताळ, नवीन वर्ष यावेळी हातात पैसे आले तर मोठा दिलासा मिळेल.

सरकारने अद्याप अधिकृत घोषणा केलेली नसली, तरी पुढील काही दिवसात स्पष्टता मिळेल अशी अपेक्षा आहे. खात्यात पैसे कधीही येऊ शकतात – पण E-KYC झालेली असणे खूप महत्त्वाचं आहे. म्हणून ज्यांनी अजून ही प्रक्रिया केलेली नाही त्यांनी तातडीने करून घ्यावी. नवीन वर्ष अगदी जवळ आलंय… बहिणींच्या चेहऱ्यावरचा आनंद बघायला बाकी वेळ नाही अशीच आशा!

अश्याच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

Leave a Comment